Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

राज्यात 2 जानेवारीपासून पुन्हा कोविड प्रतिबंधक लस

  बंगळूर : राज्यात कोविडचे जेएन १ उत्परिवर्तन वाढत असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकार दोन जानेवारीपासून राज्यात कॉर्बीवॅक्स लस देणार असल्याची माहिती उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही लस देण्यास सरकार तयार आहे. राज्यात कोविड संसर्गामुळे मृत्यू होत आहेत. राज्यात सावधगिरीचे लसीकरण …

Read More »

खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा 13 वा वर्धापन दिन थाटात

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांचा १३वा अमृतमहोत्सव शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री. बाळू बाबू पाटील सेवानिवृत्त शिक्षक झुंजवाड, श्री. गंगाधर दौलतराव देसाई निवृत्त शिक्षक निडगल, सौ. वासंती बाबूराव …

Read More »

युवा समितीच्या वतीने उद्या निवेदन

  बेळगाव : कन्नड संघटना आणि कर्नाटक प्रशासनाने चालविलेल्या कन्नड फलक बळजबरी, मराठी फलकांच्या अवमानाविरुद्ध व दोन भाषिकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. पोलीस आयुक्त बेळगाव व महानगर पालिका आयुक्त, बेळगाव यांना निवेदन देण्यात …

Read More »

कॅपिटल वन व्याख्यानमालेची दिमाखात सुरुवात

  बेळगांव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या एस.एस.एल.सी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे निवृत प्राचार्य आर. के. पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार, मराठी विषयाचे व्याख्याते ठळकवाडी हायस्कूलचे श्री. सी. …

Read More »

सदलगा नगरपालिका पोटनिवडणूकीत चारही प्रभाग काँग्रेस समर्थक गटाकडे

  नगरपालिकेवर काँग्रेसच्या सत्तेचे संकेत; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सदलगा : चिकोडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या सदलगा पोटनिवडणूकीत चारही प्रभागांवर काँग्रेस समर्थकांनी बाजी मारली. प्रतिष्ठेची ठरलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांनी १२६ मताधिक्य मिळवून महांतेश देसाई यांना पराभूत केले. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि चिक्कोडी सदलगा …

Read More »

ठाण्यात रेव्ह पार्टी, १०० जण ताब्यात

  ठाणे : नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस ही अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत. घोडबंदर येथील कासारवडवली भागात रेव्ह पार्टी आयोजित केली …

Read More »

छ. संभाजीनगरमध्ये हँडग्लव्ह बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू

  संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला. वाळूज औद्योगिक परिसरात आग वाळूज …

Read More »

19 वे  येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी

येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. साहित्य संघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी प्रा. सी. एम. गोरल यांनी उपस्थित साहित्य संघाच्या सदस्यांचे …

Read More »

१० वीच्या विद्यार्थ्यासह सहलीतील नको ते फोटो लीक; मुख्याध्यापिका निलंबित

  चिक्कबळ्ळापूर : दहावीच्या विद्यार्थ्यासह शाळेच्या सहलीदरम्यान रोमॅंटिक पोज देत फोटो काढणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून कर्नाटकातील मुरुगमल्ला व्हिलेज गव्हर्नमेंट हायस्कूलच्या मुख्यध्यापिका पुष्पलता आर. यांना निलंबित करण्यात आले आहे. हे वादग्रस्त कथित ‘फोटोशूट’ चिक्कबळ्ळापूर येथे एका शैक्षणिक सहलीदरम्यान घडले. फोटोंमध्ये मुख्याध्यापिका विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि …

Read More »

भात खरेदी दलालाकडून वजनात काटेमारी

  खानापूर : सध्या भात मळणीचे हंगाम सुरू असून मळणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतातच आपलं भात दलालाना विकत असतात, परंतु कापोली येथे एका शेतवडीत शेतकऱ्यांचे भात खरेदीसाठी आलेल्या दलालावर शेतकऱ्यांना संशय आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात वजन काटा हाताळण्याचे रिमोट कंट्रोल मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. भात …

Read More »