Sunday , July 26 2026
Breaking News

19 वे  येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी

Spread the love

येळ्ळूर : सालाबाद प्रमाणे यावर्षीही 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. साहित्य संघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी प्रा. सी. एम. गोरल यांनी उपस्थित साहित्य संघाच्या सदस्यांचे स्वागत केले व बैठक बोलाविण्याचा उद्देश स्पष्ट केला. साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी गतवर्षीचा जमाखर्च सादर केला.

साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यावेळी बोलताना म्हणाले, साहित्य परंपरा अखंडित ठेवण्याच्या हेतूने यावर्षीही 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 4) फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही साहित्य संमेलन उत्साहात यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. प्रतिवर्षा प्रमाणे संमेलन पाच सत्रात होणार आहे. प्रतिवर्षी ग्रंथ दिंडीला होत असलेला उशीर पाहून यावर्षी ग्रंथदिंडीचा मार्ग कमी करण्याचे ठरविण्यात आले असून, ग्रंथ दिंडीची सुरुवात ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून करण्याचे ठरविण्यात आले. ग्रंथ दिंडीचा मार्ग कमी झाल्यामुळे  पाचही सत्राना पुरेपूर वेळ मिळणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, सुभाष मजुकर व  अनेक  साहित्यप्रेमी उपस्थित होते, शेवटी प्रा. सी. एम. गोरल यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *