Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी

  गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव …

Read More »

बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न

  बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप. बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बसवेश्वर सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री. बाळाप्पा कगणगी हे होते. सभेची सुरुवात श्री. कगणगी आणि …

Read More »

साईदर्शनाला जाताना वाटेत काळाचा घाला, चार भाविकांचा मृत्यू, ८ महिन्यांचा चिमुकला बचावला

  सोलापूर : साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण …

Read More »

देशात 24 तासांत 600 हून अधिक नवे कोरोनाबाधित, दोन रुग्णांचा मृत्यू

  नवी दिल्ली : देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. देशात गेल्या 24 तासांत 600 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे. ही नवीन आकडेवारी फार चिंताजनक आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटमुळे टेन्शन वाढलं आहे. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का? : सिध्दरामय्यांचा सवाल

  रोजगाराची हमी पूर्ण न केल्याबद्दल ताशेरे; ‘युवानिधी’ योजनेला चालना बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच हमी योजनांवर टीका केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आणि ते अर्थतज्ज्ञ आहेत का, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देऊ न शकल्याबद्दलही …

Read More »

कोविडसंदर्भात महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

  बेळगाव : आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पसरत असलेल्‍या कोरोना सब स्ट्रेन जेएन.१ चा संसर्ग आता कर्नाटकातही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेत आज महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जे.एन.१ बाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बैठकीत बोलताना महापौर शोभा सोमनाचे म्हणाल्या की, कोरोना उपप्रकार JN.1 चा संसर्ग आता सार्वजनिक क्षेत्रात …

Read More »

दिगंबराच्या जयघोषात आडी दत्त मंदिरात दत्त जयंती

  लाखो भाविकांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पौर्णिमा निर्दोष असते. तसे आपले मन निर्दोष असावे. सद्गुरुस्वरूप दैवत मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त स्वरूपात अवत्तीर्ण झाले. जगात भाषा, जातीच्या द्वारे भेदाने कलह माजला आहे. माणसाला अभेद ज्ञानाकडे वळविण्यासाठी हा उत्सव आहे. जगातील भेद संपविण्यासाठी परमाब्धी ग्रंथ अभ्यासणे व आचरणात आणणे आवश्यक आहे. माणसाचे …

Read More »

मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची मोठी घोषणा

  नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पैलवानांनी नाराजी व्यक्त केली. …

Read More »

“हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू”! एमव्ही केम प्लुटोवरील ड्रोन हल्ल्यावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले

  नवी दिल्ली : ‘एमव्ही केम प्लुटो’ जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील ‘एमव्ही साईबाबा’वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. यासंदर्भात बोलताना, संबंधित हल्लेखोरांना पाताळातूनही शोधून काढू, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या सागरी क्षेत्रातील हालचाली वाढल्या …

Read More »

आरबीआयसह मुंबईत ११ ठिकाणं बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी, पोलिसांकडून शोध सुरु

  मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा ईमेल आला आहे. यामध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल खिलापत इंडिया या नावाच्या मेल आयडीवरुन आला आहे. धमकी देणाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, इतर बँकांचे अधिकारी आणि काही …

Read More »