Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावमध्ये आढळला पहिला जेएन-1 कोविड रुग्ण

  बेळगाव : बेळगावमध्ये पहिला जेएन-1 व्हायरसचा कोविड रुग्ण आढळला आहे. जेएन-1 कोविडचा पहिला रुग्ण आढळून आल्याने बेळगावात खळबळ उडाली आहे. केरळमध्ये कोविडच्या जेएन-1 व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्या पाठोपाठ या व्हायरसची लागण झाल्याने राजधानी बेंगळूरमधील एका ६४ वर्षीय रुग्णाचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी नुकतेच जाहीर …

Read More »

कंग्राळी बुद्रुक येथे अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीचा खून?

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे अनैतिक संबंधातून पत्नीने पतीचा संशयास्पद खून केल्याची घटना घडली आहे. सुभाष कल्लाप्पा हुरुडे (वय ५६) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेच त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंग्राळी बुद्रुक येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या सुभाष कल्लाप्पा हुरुडे याचा …

Read More »

‘अरिहंत’च्या कुन्नुर शाखेचा वर्धापन दिन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सहकारी संघाच्या कुन्नूर शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महेंद्र जाधव यांनी स्वागत केले. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांच्या हस्ते लक्ष्मी व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक सरकारकडून सहकारत्न पुरस्कार मिळाल्याने …

Read More »

बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे हेल्मेटबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

  निपाणी (वार्ता) : दुचाकींच्या अपघातामध्ये हेल्मेट आभावी अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाणेतर्फे येथील कन्नड मुलांची शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. प्रारंभी मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांनी स्वागत केले. उपनिरीक्षक डी. बी. …

Read More »

श्रीरामलला मंदिर अक्षता कलश शोभायात्रेला निपाणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : अयोध्या मधून येथे आलेल्या रामलला मंदिर अक्षता कलशांची शोभायात्रा अभूतपूर्व उत्साह व चैतन्यमय वातावरणात पार पडली. यामध्ये निपाणीसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी अक्षतांचा मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी ८० मंगल कलशांची बांधणी व सजावट केली होती. सायंकाळी तमनाकवाडा येथील …

Read More »

निपाणी बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी

  निपाणी (वार्ता) : डिसेंबर सुरू झाला तसा शहराला नाताळची चाहुल लागली आहे. व्यापारी आणि विक्रेत्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे. मात्र, आता ख्रिसमस अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे. निपाणी आणि परिसरात ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. …

Read More »

समाज सुदृढ बनवण्याची जबाबदारी सर्व समाजातील संस्थानी घ्यावी

  काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार नागराजू यादव बेळगाव : समाजातील युवक-युवतींनी उच्च शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यावे. विज्ञानवादी समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. समाज सर्व पातळीवर सुदृढ बनवण्याची जबाबदारी सर्व समाजातील विविध संस्थांनी घेतली पाहिजेत. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती साधताना ‘नवहिंद सोसायटी’चे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन प्रिव्हिलेज कमिटीचे …

Read More »

राज्याला तातडीने दुष्काळ निवारण निधी मंजूर करा

  मुख्यमंत्री सिध्दरामय्यांची केंद्रीय मंत्री अमित शहांना विनंती बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नैसर्गिक आपत्तींबाबत तातडीने उच्चस्तरीय समितीची बैठक बोलावून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून २३६ तालुक्यांपैकी २२३ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सुमारे ४८.१९ लाख …

Read More »

तालुका, जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया महिनाभरात शक्य

  राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन बंगळूर : राज्याच्या जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे येत्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षण निश्चित करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाकडून परत घेतल्याच्या कारवाईला …

Read More »

एसडीपीआयच्या वतीने बेळगावात केंद्र सरकारचा निषेध

  बेळगाव : संसदेतील तब्बल 141 खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याच्या रागातून त्यांचे निलंबन करणे ही लोकशाहीची हत्या आणि लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या घटनाविरोधी कृत्याच्या निषेधार्थ एसडीपीआय सदस्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी …

Read More »