Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

वंटमुरी प्रकरणी काकती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलंबित

  बेळगाव : काकती पोलीस ठाण्यांतर्गत न्यु वंटमुरी गावात एका महिलेसोबत झालेल्या अमानुष घटनेत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यात कसूर आणि जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा दाखवल्याच्या आरोपावरून काकती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना आज सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात योग्य काम केले असते तर हे प्रकरण इतके मोठे …

Read More »

यूपीएससी परीक्षेत मेंढपाळाच्या मुलाचा झेंडा!

  बेडकिहाळच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा डॉ. हर्षल कोरेचे यश; धनगर समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील मेंढपाळ कुटुंबातील डॉ. हर्षल कोरे यांनी वडील म्हाळू कोरे व आई संगीता कोरे यांच्या मार्गदशनाखाली वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण …

Read More »

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, एकूण 66 तास काम चालले

  बेळगाव : येथील सुवर्ण विधानसभा येथे चार डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाची आज शुक्रवारी सांगता झाली.10 दिवस झालेल्या या अधिवेशनात एकूण 66 तास 10 मिनिटे विधानसभेचे कामकाज चालले अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष यु.टी. खादर म्हणाले, दहा दिवस चाललेल्या हिवाळ्यातील सतरा विधेयकांना मंजुरी मिळाली. राज्याबरोबरच विशेषता उत्तर कर्नाटकातील …

Read More »

आमदार हलगेकर यांचे अभिनंदन तर लक्ष्मण सवदी यांचा जाहीर निषेध : धनंजय पाटील

  खानापूर : आपल्या मातृभाषेत मत मांडणे म्हणजे इतर भाषेचा अपमान होत नाही, तर इतर भाषेचा तिरस्कार करणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे, भारतीय लोकशाहीत राज्यघटनेने जे अधिकार घालून दिलेत त्या प्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपल्या मातृभाषेत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती लोकसभा असुदेत किंवा विधानसभा अन्य कुठलही व्यासपीठ. …

Read More »

विद्युतभारित तार तुटल्याने मोटारसायकल जळून खाक : मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावात विद्युतभारित तर तुटून दुचाकी जळून खाक झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. खानापूर हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. एक मोठी विद्युतभारीत तार दुचाकीवर तुटून पडल्याने दुचाकीस्वार बेशुद्ध अवस्थेत दुचाकीसह घसरला. या …

Read More »

आमदार विठ्ठल हलगेकरांनी मराठीतून मांडल्या खानापूरच्या समस्या!

  खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज विधानसभेत मराठी भाषेत खानापूर तालुक्याच्या समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर चर्चा सुरु राहिली. या दरम्यान, विविध आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. या दरम्यान, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्याला …

Read More »

लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ तयार होता; मुख्य आरोपीची धक्कादायक माहिती

  नवी दिल्ली : लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ अशा दोन योजना आरोपींनी तयार केल्या होत्या. जर नियोजन केल्याप्रमाणे पहिली योजना यशस्वी ठरली नाही, तर पर्यायी योजना राबविण्याची तयारी ठेवण्यात आली होती. घुसखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

  नवी दिल्ली : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. या …

Read More »

महात्मा गांधी शांती पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित

  निपाणी (वार्ता) : भुवनेश्वर (ओडीसा) येथील एमजीजीपी फाऊंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालय, अर्जुनी (ता. कागल) येथे कार्यरत असेलले आणि निपाणी येथील रहिवासी नामदेव चौगुले यांना महात्मा गांधी जागतिक शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौगुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक करीत असलेल्या कार्याची नोंद घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान …

Read More »

विज्ञान साहित्य संमेलन जागृतीचे प्रभावी माध्यम; अंजली अमृतसमन्नावर यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने कुर्ली येथील एच जे सी चिफ फौंडेशन सतत २० वर्षे कार्य करीत आहे. ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीच्या माध्यमातून विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचा या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक याना फायदा होत आहे. …

Read More »