Monday , September 21 2026
Breaking News

महात्मा गांधी शांती पुरस्काराने नामदेव चौगुले सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भुवनेश्वर (ओडीसा) येथील एमजीजीपी फाऊंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालय, अर्जुनी (ता. कागल) येथे कार्यरत असेलले आणि निपाणी येथील रहिवासी नामदेव चौगुले यांना महात्मा गांधी जागतिक शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चौगुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण विषयक करीत असलेल्या कार्याची नोंद घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एमजीजीपी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. ऋषिकेश आचार्य यांच्या हस्ते नामदेव चौगुले त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एमजीजीपी फाऊंडेशन ही भारत सरकारच्या फंड कमिशनद्वारे मान्यताप्राप्त संस्था आहे आणि तिने देशपातळीवर विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. चौगुले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *