Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

वादळी चर्चेने आज हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजणार

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेळगाव येथे आयोजित विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार विरोधात भाजप आणि निजद असा सामना अधिवेशनात पाहायला मिळाला. मात्र अधिवेशनाचे सूप वादळी चर्चेने वाजवण्याची शक्यता आहे. विरोधकांनी कायदा सुव्यवस्था, लिंगायत आरक्षण, ऊस उत्पादक, दुष्काळ आणि उत्तर कर्नाटक विषयावरील प्रश्नांवर या …

Read More »

काँग्रेसच्या डिनर पार्टीत तीन भाजप आमदारांची उपस्थिती

  काँग्रेस प्रवेशाची चर्चा; भाजपकडून गंभीर दखल बंगळूर : बेळगावात काल रात्री उशिरा झालेल्या काँग्रेस आमदारांच्या डिनर पार्टीत भाजप आमदारांच्या सहभागावरून राजकीय दृष्ट्या वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत. पार्टीत उपस्थित तीन आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा असून प्रदेश भाजपनेही याची गंभीर दखल घेतली आहे. बेळगाव शहराच्या हद्दीतील एका खासगी रिसॉर्टमध्ये …

Read More »

संसद सुरक्षा भंग प्रकरण; सहा आरोपींपैकी दोघांचे कर्नाटक कनेक्शन

  बंगळूर : २००१ च्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (१३ डिसेंबर) सुरक्षेचा मोठा भंग करताना, कामकाज सुरू असताना दोघाजणानी अभ्यागतांच्या गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली, घोषणाबाजी केली आणि पिवळ्या रंगाचा रासायनिक धूर सोडल्याने सभागृहात घबराट आणि गोंधळ उडाला. यापैकी दोघा आरोपींचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले …

Read More »

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर

  मुंबई : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. श्रेयस तळपदेची प्रकृती कशी आहे? अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा …

Read More »

67 व्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना

  बेळगाव : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे होणाऱ्या 67 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा हँडबॉल संघ रवाना झाला आहे. नुकत्याच शिवपुरी मध्य प्रदेश येथे झालेल्या 34 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावले होते. आता …

Read More »

स्त्रीभ्रूणहत्ये विरोधात लवकरच कडक सुधारित कायदा : मंत्री दिनेश गुंडूराव

  बेळगाव : महिलांच्या सुरक्षा संदर्भात हक्क आणि कायदे आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत.मात्र तरीही समाजात स्त्रियांसंदर्भात रुजलेली विकृत मानसिक अवस्था कायम आहे. स्त्रीभ्रूणहत्या संदर्भात असलेल्या कायद्यात बदल करून, या विरोधात सुधारित कायदा अंमलात आणला जाईल. स्त्रीभ्रूणहत्येला जबाबदार असणाऱ्यांना, कडक शिक्षा करण्यासाठी कर्नाटक राज्यात लवकरच सुधारित …

Read More »

निपाणीकरांचे नव्या तलावाचे स्वप्न लवकरच पूर्ण; नगरसेवक विलास गाडीवड्डर

  अभियंते श्रीकांत मकाणी यांची भेट निपाणी (वार्ता) : शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी नवीन तलाव निर्मितीच्या कामासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व लघु पाटबंधारे मंत्री एम. एस. भोसराज यांची बेळगांव विधानभवनात भेट घेतली. प्रशासनाने या कामास सकारात्मक प्रतिसाद देत तलाव निर्मीर्तीच्या जागेचा सर्व्हे करण्याचा २४ तासात …

Read More »

रयत संघटनेच्या आंदोलनाला यश; मुख्यमंत्र्यांसमवेत केली चर्चा

  पुढील बैठकीसाठी बंगळूरमध्ये बैठकीचे निमंत्रण निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनाने बेळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. ऊसाला कारखान्यांनी प्रति टन ३५०० आणि सरकारने २००० रुपये द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य संघटनेने आंदोलन छेडले होते. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत गोंधळ, काँग्रेसचे ५ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

  नवी दिल्ली : लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांना धुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून आज  (१४ डिसेंबर) लोकसभेत खासदारांनी गोंधळ घातला. त्याच पार्श्वभूमीवर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ५ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा …

Read More »

अनाथ वृद्धावर समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी केले अंत्यसंस्कार…

  बेळगाव : गेल्या काही महिन्यापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले अशोक बिडीकर वय 60 मूळ गाव इचलकरंजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी त्यांचा मृत्यू झाला ही माहिती निराधार केंद्रातील संयोजक रावसाब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांना …

Read More »