Monday , September 21 2026
Breaking News

67 व्या राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना

Spread the love

 

बेळगाव : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियम येथे होणाऱ्या 67 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा हँडबॉल संघ रवाना झाला आहे.
नुकत्याच शिवपुरी मध्य प्रदेश येथे झालेल्या 34 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावले होते. आता दिल्ली येथे 16 ते 23 डिसेंबर दरमान्य होणाऱ्या 67व्या अखिल भारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेचा चमू विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या संत मीरा संघात गोलरक्षक भावना बेरडे, ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर, मनस्वी चतुर, वर्षा परीट, सुहाणी गुदेकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर, स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर, या खेळाडूंचा संघात समावेश आहे. या संघासोबत शाळेच्या क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, बसवंत पाटील रवाना झाले आहेत. या संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहान लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *