Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

मुतगा पीकेपीएस गैरव्यवहार प्रकरणी रमाकांत कोंडूस्कर घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : मुतगा पीकेपीएसमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत जोपर्यंत व्यवहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण इथून उठणार नाही असा निर्धार मुतगा येथील शेतकऱ्यांनी केला असून मुतगा येथील युवा शेतकरी सचिन पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुतगा येथील शेतकऱ्यांनी पीकेपीएस संस्थेमध्ये गैरव्यवहार …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’च्या ममदापूर शाखा अध्यक्षपदी कावडकर

  उपाध्यक्षपदी निरंजन पाटील यांची निवड निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ममदापूर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन कावडकर यांची तर उपाध्यक्षपदी निरंजन पाटील-सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी विजय हातगिणे यांनी स्वागत करून गेल्या ८ वर्षांपासून ममदापूर शाखा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. शाखेकडे ४.८७ कोटी …

Read More »

राजाभाऊ शिरगुप्पेंचा चळवळीतील सहभाग महत्त्वाचा

  प्रा. सुभाष जोशी : निपाणीत शोकसभा निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध चळवळीमध्ये राजाभाऊ शिरगुप्प्पे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाखाण्याजोगे आहे. सर्वत्र भटकंती करत ईशान्य भारत त्यांनीच प्रथम दाखविला आहे. आता कार्यकर्त्यांनी सावध राहून जागृतपणे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे …

Read More »

मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार; युवा शेतकऱ्याचे आमरण उपोषण

  बेळगाव : मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून शुक्रवारपासून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत या संघाची चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते चंद्रकांत कोंडूस्कर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास …

Read More »

विधायक उपक्रम व संस्कृतीतून तरुणांचे शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे

  कागलच्या शाहू लोकरंग महोत्सवात ११४ मंडळांचा मोरया पुरस्काराने सन्मान कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे कार्य गणेशोत्सव काळात तरुण मंडळांनी विधायक उपक्रम राबवून केले.या तरुणांनी संस्कृतीचे जतन करीत छत्रपती शाहू महाराज यांचा जनसेवेचा वारसा जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले, असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह …

Read More »

महामार्गावर वाहने अडवणाऱ्या हायवे पोलिसांना समज द्या

  सर्वपक्षीय तालुकाध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातून जात असलेल्या महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे राहून हायवे पोलीस वाहनधारकांना नाहक त्रास देत आहेत. हायवे पोलिसांच्या करवी होणारी अडवणूक तात्काळ बंद व्हावी व प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा. यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार तहसीलदार जितेंद्र इंगळे …

Read More »

इंडो काउंटच्या कामगारांकडून पगारवाढीच्या कराराबद्दल पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार

  दरमहा दहा हजार पगारवाढीने कामगारांत समाधान कागल (प्रतिनिधी) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडो काउंट प्रा. लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली. पगारवाढीच्या या यशस्वी कराराबद्दल कंपनीच्या कामगारांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये हा …

Read More »

बेळगावातील 450 खाटांच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव : मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील

  बेळगाव : बेळगावातील 450 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना,वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका मंत्री डॉ. शरण प्रकाश आर. पाटील यांनी केली आहे. शहरातील बिम्स रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. 04) आयोजित बिम्स प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय …

Read More »

दिवाळी सणासाठी वायव्य परिवहन महामंडळातर्फे ५०० हून अधिक विशेष बस व्यवस्था

  हुबळी : वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांचा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आणि उत्सवानंतर परतणाऱ्या सार्वजनिक प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील आणि राज्याबाहेरून विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 500 हून अधिक विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. ११ नोव्हेंबरला शनिवार व रविवार, १२ तारखेला नरक चतुर्दशी, १३ तारखेला सोमवार अमावसे, लक्ष्मीपूजन आणि …

Read More »

डॉ. चारुदत्त कासार यांना पीएचडी प्रदान

  निपाणी (वार्ता) : चिकोडी तालुका शिक्षण संस्थेच्या श्रीमती ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. चारुदत्त भालचंद्र कासार यांना धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. धारवाड येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलाधिपती व राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. …

Read More »