Friday , November 6 2026
Breaking News

बेळगावातील 450 खाटांच्या नव्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव : मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील 450 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना,वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका मंत्री डॉ. शरण प्रकाश आर. पाटील यांनी केली आहे. शहरातील बिम्स रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. 04) आयोजित बिम्स प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

जिल्हा रुग्णालय सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले. जुन्या इमारतीमुळे दुरुस्तीची बरीच कामे आधीच प्रलंबित आहेत. जिल्ह्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असून खाटांअभावी त्यांचे हाल होत आहेत. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले, शहरात 450 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यासाठी आराखडा तयार करून विभागाच्या मंत्र्यांना सूचित केले.
मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी आराखडा तयार करून जनतेच्या सोयीसाठी 450 खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर केला असून, रुग्णालयाच्या बांधकामाची जागा व अंदाजे खर्च याबाबत शासनस्तरावर तातडीने चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

रुग्णालयाच्या विविध कामांसाठी पुरेसा निधी यापूर्वीच प्राप्त झाला आहे, मात्र अधिकारी त्याचा वापर करत नाहीत. प्रकाश हुक्केरी यांनी कोणतीही गय न करता अनुदानाचा विहित कालावधीत पुरेसा विनियोग करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *