Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

रिंगरोड विरोधातील शेतकऱ्यांची सोमवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोडला बेळगाव शेतकऱ्यांनी न्यायालयीन स्थगिती घेतली आहे. यामुळे या स्थगिती संदर्भात व रिंगरोड रद्द करण्यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कॉलेज रोड (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात सोमवार दिनांक २ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना रिंगरोड …

Read More »

समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा

  शरद पै : रोटरी तर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : समाजाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळेच अनेक जण मोठ मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.देशाच्या जडणघडणीत शिक्षकासह अभियंत्यांचे काम महत्त्वाचे आहे. देशाचे वर्तमान आणि भविष्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत रोटरीचे जिल्हा प्रांतपाल शरद पै यांनी व्यक्त …

Read More »

भारताला टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्णपदक; रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला

  बीजिंग : चीनमधील हंगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला. त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना ट्रायब्रेकरमध्ये २-६, ६-३,१०-४ अशा सेटमध्ये हरवत सुवर्णपदक जिंकले. पहिला सेट हरल्यानंतर रोहन बोपण्णा आणि ऋतुजा …

Read More »

उचगाव क्रॉस ते कोवाड रस्त्याची दयनीय अवस्था; कागणी युवा वर्गाकडून भीक मागो आंदोलन!

  बेळगाव : उचगाव क्रॉस ते कोवाड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता सीमा हद्दीत असल्यामुळे प्रशासनाचे या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच बांधकाम खात्याने या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनीच आता चक्क भिक माग …

Read More »

बोरगाव ‘अरिहंत’च्या अध्यक्षपदी रावसाहेब पाटील

  उपाध्यक्षपदी सतीश पाटील; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : कर्नाटकानंतर महाराष्ट्र राज्यातही पदार्पण करीत सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल. अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील व उपाध्यक्षपदी सतीश पाटील (खडकलाट) यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक …

Read More »

कावेरी पाणी प्रश्न; व्यवस्थापन प्राधिकरणाचाही तीन हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा आदेश

  नियंत्रण समितीचा आदेश कायम; कर्नाटक अडचणीत बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्यासाठी राज्यव्यापी बंद सुरू असताना, आज नवी दिल्लीत झालेल्या कावेरी नदी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीडब्ल्यूएमए) बैठकीत कावेरी जल नियंत्रण समितीने (सीडब्ल्यूआरसी) यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश कर्नाटक सरकारला दिले आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडूला दररोज तीन हजार क्युसेक पाणी …

Read More »

…तब्बल 30 तास यंदाची विसर्जन मिरवणूक!

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या अशा जयघोषात पारंपारिक ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली. गुरुवारी सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. हुतात्मा चौकात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती ती …

Read More »

कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

  बेळगाव : आज शुक्रवार दि. २९ व शनिवार दि. ३० रोजी बेळगाव जिल्ह्यावरील ढगांवर रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यास सुरुवात झाली. बेळगाव सांबरा विमानतळ येथे बेळगाव शुगर्सच्या माध्यमातून या प्रयोगाला चालना देण्यात आली. बेळगाव शुगर्सला नागरी विमान उड्डयन निर्देशालयाच्या महासंचालकांच्या कार्यालयाने जिल्हातील ढगांवर रसायनांची फवारणी …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे रविवारी मोदेकोप येथे मोफत आरोग्य शिबीर

  खानापूर : अखिल भारतीय कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर यांचे मार्फत मोफत नेत्र शिबीर रविवार दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी विश्व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तालुका खानापूर मधील नागुर्डा ग्रामपंचायत मधील मोदेकोप मराठी शाळा मोदेकोप येथे भव्य मोफत नेत्र शिबिर सकाळी ठीक 10 ते दुपारी 3 पर्यंत खानापूर …

Read More »

कर्नाटक बंदमुळे सामान्य जनजीवन प्रभावित

  कावेरी प्रदेशात बंदला चांगला प्रतिसाद बंगळूर : कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी पुकारलेला कर्नाटक बंद कावेरी खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये यशस्वी झाला. दरम्यान, किनारपट्टी प्रदेश आणि उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी प्रतिसाद होता. बंगळुरमध्ये, पोलिसांनी टाऊन हॉलमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, तेथून त्यांनी फ्रीडम पार्कमध्ये रॅली काढण्याची योजना आखली …

Read More »