Monday , April 20 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे रविवारी मोदेकोप येथे मोफत आरोग्य शिबीर

Spread the love

 

खानापूर : अखिल भारतीय कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर यांचे मार्फत मोफत नेत्र शिबीर रविवार दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी विश्व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तालुका खानापूर मधील नागुर्डा ग्रामपंचायत मधील मोदेकोप मराठी शाळा मोदेकोप येथे भव्य मोफत नेत्र शिबिर सकाळी ठीक 10 ते दुपारी 3 पर्यंत खानापूर तालुक्यातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती.
ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर व सिविल हॉस्पिटल खानापूर यांच्या नियोजनातून सदरी उपक्रम नियोजित केला आहे तसेच ग्रामपंचायत नागुर्डा व निलावडे यांच्या आयोजनातून मौजे
मोदेकोप मराठी शाळा मोदेकोप या ठिकाणी सदरी नेत्र शिबिर आरोग्य तपासणी व स्त्रिया करिता मोफत तपासणी असा उपक्रम खानापूर तालुक्यातील सर्व लोक प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या संयोजनातून खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांकरिता हा उपक्रम आयोजित केला आहे.
वय 40 वर्षे वरील स्त्री- पुरुष यांचेकरिता नेत्र चिकित्सा करून मोफत चष्मे देण्यात येणार आहेत तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता मोतीबिंदू असल्यास मोफत सरकारी सवलती मध्ये ऑपरेशन करून चष्मे दिले जाणार आहेत तसेच श्री ओर्थो व ट्रॉमा सेंटरतर्फे मधुमेह, रक्तदाब, हाडांची तपासणी सोबतच सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिरामध्ये आपली नाव नोंदणी करण्याची आहे तसेच आपले आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आपला संपर्क नंबर याची झेरॉक्स कॉपी नोंदणी करिता आणायचे आहे.
या कार्यक्रमांमध्ये खानापूर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी व सभासद सेवेकरिता उपस्थित राहणार आहेत. तसेच मोदेकोप गावातील सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, संघ संस्थांचे अध्यक्ष व सभासद तसेच सर्व युवावर्ग शाळा समिती यांचे आयोजन असणार आहे.
तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी व सभासद यांच्याकडून आवाहन केले जात आहे. अधिक माहिती करिता या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा
अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक बनोवशी व पदाधिकारी
8277109909, 9448381539, 9241417357, 9164103842, 8722258114, 9380698844,
9019246236.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *