Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

सार्वजनिक गणेश मंडळे-पोलिसांची बैठक

  बेळगाव : मार्केट पोलीस ठाणे परिसरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, म्हणून पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडली. यावेळी उत्सवात काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासह अनेक गोष्टींवर पोलिसांनी सूचना केल्या. तसेच, गणेश मंडळांचे म्हणणेही ऐकून घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, बेळगाव शहरात 170 सार्वजनिक गणेशोत्सव …

Read More »

रक्षाबंधनाची महिलांना भेट; सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय सर्वांसाठी घेतला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील महिलांना दिलेली ही भेट आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा …

Read More »

गृहलक्ष्मी योजना १३ हजार ठिकाणाहून एकाच वेळी होणार जारी; मुख्य कार्यक्रम आज म्हैसूरात

  बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजना बुधवारी १३ हजार ठिकाणी एकाच वेळी सुरू होणार आहे. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात दक्षिण कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील १.१ लाखांहून अधिक महिला लाभार्थी सहभागी होतील. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेस नेते राहूल गांधी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, …

Read More »

लवकरच कर्नाटक भाजपमुक्त होईल : माजी मंत्री रेणुकाचार्य

  भाजपला घरचा आहेर बंगळूर : कर्नाटक भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह सुरूच आहे, भाजप नेते, माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांनी राज्य लवकरच भाजपमुक्त होणार असल्याचे मंगळवारी सांगितले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे विश्वासू रेणुकाचार्य आज शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की येडियुरप्पा यांची पक्षात झालेली उपेक्षा …

Read More »

बिजगर्णी गावातील श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर

  बेळगाव : येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालय, भक्तांना पावणारा आहे. श्रावण महिन्यात बिजगर्णी गावात मोठ्या उत्साहात धार्मिक विधी केल्या जातात. त्यामुळेच श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम कमिटीने हाती घेतले आहे. जवळ जवळ अर्धेअधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. नुकताच मंदिरात पूजन करण्यासाठी नंदी व पिंडी बनवून कारागिरांना भेटुन कुडाळ (सिंधुदुर्ग) …

Read More »

सरदार्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

  बेळगाव : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आल. कार्यक्रमकाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी होते. व्यासपीठावर मंजूषा अडके, संपदा कलकेरी, अल्ताफ जहांगीर, एम. ए. डांगी, भाग्यलक्ष्मी यलिगार, राधिका मठपाती, वासंती बेळगेरी, सुशीला गजेंद्रगड उपस्थित होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यानी गायिलेल्या …

Read More »

मराठा मंडळ संस्थेत आर्थिक गैरव्यवहारांतर्गत सरकारी अनुदानित शिक्षकांची भरती

  बेळगाव : मराठा मंडळ संस्थेच्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचे संस्थेच्या एम्.ए. बी.एड्. विशेष गुणवत्ताप्राप्त इंग्रजी विषय शिक्षिका अक्षता नायक यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केला. यासंबंधी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना याविषयी तक्रार देण्यात आली …

Read More »

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव, बेंगलोर, मंगळूर अंतिम फेरीत

  बेळगाव : माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव मंगळूर, बेंगलोर संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात बेंगलोरने धारवाडचा 2-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बेळगांवने मंगळूरचा 3-0 असा …

Read More »

कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळाने घ्यावी

  पोलिसांतर्फे शहापुरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न बेळगाव : येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे शहापूर भागातील सर्व सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मंगळवारी घेण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्याच्या आवारात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यंदाचा श्री गणेश उत्सव शांततेने …

Read More »

हेस्कॉमवर मोर्चा काढताच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

  रयत संघटनेचा आक्रमक पवित्रा; तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग ७ तास थ्री फेज तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्ट सर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत …

Read More »