Sunday , July 26 2026
Breaking News

विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव, बेंगलोर, मंगळूर अंतिम फेरीत

Spread the love

 

बेळगाव : माळमारुती येथील स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव मंगळूर, बेंगलोर संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात बेंगलोरने धारवाडचा 2-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बेळगांवने मंगळूरचा 3-0 असा पराभव केला, माध्यमिक मुलांच्या गटात बेंगळुरने धारवाडचा 1-0 असा पराभव केला, तर बेळगावने मंगळूरचा 1-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, संतमीरा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रकाश पुजारी, तुषार ताशीलदार, ओमकार देसाई, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते ओंकार सरस्वती भारत माता फोटो पूजन दीपप्रज्वलन व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पंच विजय रेडेकर, कौशिक पाटील, योगेश सावगावकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, बसवंत पाटील, मयुरी पिंगट, भारती बाळेकुंद्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा मेलीनमनी तर आभार सरोजा कटगेरी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *