Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

गर्लगुंजी -इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी -इदलहोंड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या पाच वर्षात या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले. त्यामुळे डांबरीकरणाचा पत्ताच नाही. गर्लगुंजी-इदलहोंड रस्त्यावरून नेहमी वीटा, …

Read More »

तुकाराम को-ऑप. बँकेला ६७ लाख रुपयांचा निव्वळ नफा : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : तुकाराम को-ऑप. बँकेने गत आर्थिक वर्षात ६७ लाख ७ हजार ७७० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. संस्थेची ७२ वी सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) होणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी शुक्रवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, …

Read More »

कारखान्याच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्या : रमाकांत कोंडूसकर

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. २५) विविध गावांत प्रचार केला. त्यानंतर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले. तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉमवर मंगळवारी मोर्चा

  निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. …

Read More »

जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर

  केरळमध्ये मोठी दुर्घटना! वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या …

Read More »

बेळगाव– दिल्ली विमानाचे बुकिंग सुरू

  बेळगाव : अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेळगाव-दिल्ली थेट विमानाचे बुकिंग सुरू झाले आहे. बेळगाव ते नवी दिल्ली अशी इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे. विमान नवी दिल्लीहून दुपारी ३.४५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६.०५ वाजता बेळगावला उतरेल. 2 तास 20 मिनिटे प्रवास …

Read More »

दूधगंगा नदीवरील विद्युत मोटारींची चोरी 

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 …

Read More »

निपाणीत महिनाभरात दुसऱ्यांदा लोकायुक्तांची धडक

  चार तक्रारी दाखल; कामे न होण्यासह लाचेची मागणी निपाणी (वार्ता) : शहरातील महसूल खात्यासह विविध सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारीअडचण करत आहेत. शिवाय कामासाठी लाच मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पार्श्वभूमीवर जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी येथील शासकीय विश्रामधामात अचानक भेट …

Read More »

मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

  दिल्ली : मणिपूर हिंसाचारामध्ये ज्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करत आहे त्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारातील एकूण 27 …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे वैज्ञानिक दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ व हिंडलगा गावचे सुपुत्र श्री. दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. श्री. प्रकाश …

Read More »