Wednesday , April 22 2026
Breaking News

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे वैज्ञानिक दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ व हिंडलगा गावचे सुपुत्र श्री. दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. श्री. प्रकाश बेळगुंदकर यांनी शास्त्रज्ञ सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. यानंतर शास्त्रज्ञ श्री. दिनकर साळुंखे यांचा हायस्कूलच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी शास्त्रज्ञ श्री. दिनकर साळुंखे म्हणाले आजच्या युवा पिढीला पूर्वीपेक्षा जास्त सोयी सुविधा मिळत आहेत. तसेच गुगल, यूट्यूब, इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ व्हावे असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व कोरोनाच्या काळातील लसीचे संशोधन करण्यासाठी व लस तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम याचे अनुभव सांगून आपला सहभाग किती महत्त्वाचा होता हे सांगितले तसेच भावी पिढीने विज्ञाननिष्ठ राहून इस्रो सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा असे सुचवले तसेच हायस्कूलमध्ये चाललेल्या उपक्रमशील शिक्षणाचे आणि शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये प्रायमरी शाळेचे सहशिक्षक श्री. ईश्वर पाटील सर यांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन व शास्त्रज्ञ या विषयी आपले विचार मांडले. शेवटी जी. आय. गुंजटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एम. पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *