Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

शिनोळीत स्वातंत्र्यदिनी लक्ष्मी गणपती बामुचे यांच्यातर्फे रा. शाहू विद्यालयाला स्मार्ट टीव्ही भेट

  शिनोळी (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी गावचे सुपुत्र व जवान गणपती बामुचे यांच्या पत्नी लक्ष्मी गणपती बामुचे …

Read More »

व्याघ्र कॉरिडोरमुळे कळसा-भांडुरा प्रकल्पाला अडथळे : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

  पणजी : म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भात भाजपने कोणतेही राजकारण केलेले नाही. याबाबतच्या सविस्तर प्रकल्प अहवालासही (डीपीआर) केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. कोणत्याही स्थितीत ही योजना मार्गी लागेल. पण नियोजित व्याघ्र कॉरिडोरमुळे प्रकल्पाला अडथळे येत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, …

Read More »

देवराज अर्स भवनातील आमदार कार्यालय बंद पाडणे हा सूडबुद्धीचा प्रकार

  भाजपचे पत्रकार परिषदेत आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात आमदार कार्यालयाची मागणी होत असल्याने येथील शिवाजी नगरातील देवराज अर्स भवनात आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी २१ जूलै रोजी पत्र देऊन मागणी केली. त्यानुसार तालुका अधिकाऱ्यांच्या परवानगी नुसार देवराज अर्स भवनात आमदार कार्यालयाचे उद्घाटन केले. मात्र खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्षानी आक्षेप …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जवानाकडे सुपूर्द!

  अंकुरम शाळेचा उपक्रम: निपाणी परिसरातून कौतुक निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी राखी पौर्णिमेनिमित्त राख्या तयार केल्या होत्या. या राख्या भारतीय सैन्य दलातील जवान नामदेव लाड यांच्याकडून नागालैंड येथे कार्यरत असलेल्या जवानांना पाठवण्यात आल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व निपाणीतील …

Read More »

‘माणूसपण’ टिकण्यासाठी झटणाऱ्यांचे जाणे क्लेशदायी

  डॉ. अच्युत माने ; निपाणीत शोकसभा निपाणी (वार्ता) : संवेदनशीलता हरवत चाललेल्या या काळात माणूसपण टिकावे, यासाठी झटणाऱ्यांचे निघून जाणे क्लेशदायी आहे, अशा शब्दांत डॉ. अच्युत माने यांनी विचारवंत हरी नरके, पत्रकार मनोहर बन्ने, रानकवी शामराव जाधव यांना आदरांजली वाहिली. अंकुर कवी मंडळ, काव्यकुसुम समूह व ज्येष्ठ नागरिक संघ, …

Read More »

भारताचा आयर्लंडवर 33 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

  दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने आयर्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला. 186 धावांचा बचाव करताना भारताने आयर्लंडला 152 धावंत रोखले. आयर्लंडकडून एंड्रयू बालबर्नी याने एकाकी झुंज दिली. एंड्रयू बालबर्नी याने 72 धावांची खेळी केली. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. या …

Read More »

दोन आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांना अटक; कुडची पोलिसांची कारवाई

  रायबाग : दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून चोरलेले ट्रॅक्टर, एक टिलर आणि दुचाकी कुडची पोलिसांनी जप्त केली. रायबाग तालुक्यात अलीकडे चोरीच्या घटना वाढत आहेत. ट्रॅक्टर चोरीबाबत कुडची पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पीएसआय एस. बी. खोत यांनी दोन आंतरराज्य चोरांना अटक करून त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी …

Read More »

स्वातंत्र्यदिनी शिनोळी बु. ग्राम पंचायततर्फे रा.शाहू विद्यालयाला स्मार्ट टीव्ही भेट

  ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार शिनोळी (रवी पाटील ) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिनी शिनोळी बु. ग्रामपंचायततर्फे राजर्षी शाहू विद्यालयाला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेट दिली. डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत …

Read More »

सन्मती विद्यामंदिर येथे गुरुदेव १०८ समंतभद्र महाराजांची पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यामंदिर सिदनाळ येथे संस्थेचे संस्थापक, गुरुकुल शिक्षण प्रणालीचे पुनरोद्धारक गुरुदेव समंतभद्र महाराज यांची १३५ वी पुण्यतिथी झाली. अध्यक्षस्थानी समाजसेवक आर. पी. पाटील तर प्रमुख पाहुणे बाबासाहेब मगदूम, राजगोंडा पाटील, पी. बी. आश्रम स्तवनिधीचे सदस्य प्रदीप पाटील हे होते. प्रारंभी गुरुदेवांच्या परिचयाचे फलक …

Read More »

सर्वांच्या सहकार्यानेच दत्तगुरूची प्रगती

  संस्थापक सचिन खोत : वर्धापन दिन साजरा कोगनोळी : परिसरातील नागरिकांच्या, सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदारांच्या सहकार्यामुळेच दत्तगुरु संस्थेची प्रगती झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. संस्थेचे 2 हजार सभासद आहेत. शेअर भांडवल 11 लाख 49 …

Read More »