Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

संगमेश्वर नगर येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी

  बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील संगमेश्वर नगर येथे आज भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. संगमेश्वर नगर येथे राहणाऱ्या अर्कान रियाज नामक आठ वर्षांच्या कोवळ्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे अनेक ठिकाणी चावे घेतले. विशेषतः त्याच्या डोक्याला कुत्र्यांच्या …

Read More »

महापालिकेचा प्रताप : मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरावर चिकटवली नोटीस !

  बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस कन्नड व इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी सदर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिकटविण्याचा प्रताप महानगरपालिकेने केला आहे. पालिकेच्या या कृतीमुळे मराठी भाषिक नगसेवकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मराठी भाषेतून नोटीस मिळेपर्यंत सभा होऊ न देण्याचा निर्धार मराठी …

Read More »

आई, दोन मुलांसह वाचवण्यासाठी गेलेल्याचाही बुडून मृत्यू

  तुमकूर : पाण्यात पडलेल्या आईसह दोन मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसह चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची तुमकूर येथील सिद्धगंगा मठाजवळ घडली. गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या खड्ड्यात पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेली आईही बुडाली. दरम्यान, आईला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मुलगाही पाण्यात बुडाला. आई आणि दोन …

Read More »

चिक्कोडी येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला जीवनदान

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान टीमने तिसर्‍या रेल्वे गेट जवळ गटारीत असलेल्या गाईची सुटका करून जीवनदान दिले आहे. मंगेश पेट्रोल पंपाजवळ बंद गटारीत गाय पडली होती याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दाखल झाले त्यांनी गटारीत पडलेल्या गायीची सुटका केली. श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला वाचवण्यात …

Read More »

द्रमुक नेते सेंथिल यांच्‍या भावाला अटक, ‘ईडी’ची मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

  कोची : मनी लॉड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) तामिळनाडूचे मंत्री व द्रमुक नेते सेंथिल बालाजी यांच्या भावाला अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. सेंथिल बालाजी यांचा भाऊ अशोक यांना ईडीने केरळमधील कोची येथे अटक केली. अनेक समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नसल्‍याने ही …

Read More »

शिरढोण येथे गोठ्याला लागलेल्या आगीत ४ जनावरांचा होरपळून मृत्यू

  कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या …

Read More »

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात : पाच जण ठार तर अन्य तिघे जखमी

  चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव(३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन …

Read More »

ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

  ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …

Read More »

अजित पवार गटाला लवकरच जयंत पाटील पाठिंबा देण्याची शक्यता : सूत्र

  मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली …

Read More »