हुबळी : येथील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज घडली आहे. या दुकानाला लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवेपर्यंत दुकानातील बरेच साहित्य जळून खाक झाले होते.
दरम्यान हुबळीतील विद्यानगर येथील रूपा स्टेशनरी शॉपला ही अगा लागली होती. यामध्या अनेक साहित्य जाळून खाक झाले आहे. अचानक आग लागल्याने शेजारी असलेल्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ दाखल होत अगा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, दुकानाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही.