बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराधार केंद्रातील गरजूंना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना त्रास सोसावा लागत आहे. तसाच त्रास निराधारानाही सोसावा लागत आहे, याची दखल जिव्हाळा फाऊंडेशनने घेऊन येथील निवारा केंद्रातील 48 गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या हाकेला साद घालत अमित पाटील यांनी हे साहित्य पुरवले.
यावेळी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दु, डॉ. राजश्री अनगोळ, डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. आरती निप्पाणीकर, श्रीनिवास गुडमट्टी, अमित पाटील,
संजीवनी पाटील, गीतांजली रेडकर, सुहास हुद्दार तसेच दिलीप सावंत उपस्थित होते.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …