खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर तपासणी पथक जोमाने कामाला लागले आहे. मात्र पेरणीच्या हंगामात नागरीक शेतात असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत. याची धास्ती कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने शासनाचे नियम पाळत मास्क, सोशल डिस्टन, सॅनिटायझर आदीचे काटेकोरपणे करावे, असे आवाहन आले आहे.
तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या जवळपास २२५ गावात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अनेकजन मृत्यू पावले आहेत.
अनेक गावातून लोक आजारी आहेत. त्यांना तपासणी करायला अडचण येऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गाव पातळीवर नागरीकांची तपासणी करण्यास येत आहेत. त्याच्या सोबत अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, ग्राम पंचायत कर्मचारी आहेत.
मात्र कोरोनासंबधी कोणती लक्षणे नसतानाही काही नागरीक पाॅझिटीव्ह असल्याचा निकाल येत आहे. हीच भिती मनात ठेवून नागरीक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. मात्र हे पथक गावातील सरकारी शाळात, मंदिरात, ग्राम पंचायत मंदिरात आदी ठिकाणी तपासणीसाठी प्रतिक्षेत असताना दिसत आहे.
