Sunday , October 13 2024
Breaking News

शेतकरी मित्रमंडळीच्यावतीने गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : शेतकरी मित्रमंडळाच्यावतीने गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे वायरमॅन नारायन पाटील (मणतुर्गा), खानापूर तालुका हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अभियंत्या सौ. कल्पणा तिरवीर व लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील या मान्यवरांचा सत्कार गर्लगुजीचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत कल्लापा पाटील व शेतकरी मित्रपरिवार मंडळाच्यावतीने येथील कृष्ण मंदिरात सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नामदेव सिध्दाणी होते. यावेळी प्रास्ताविक व स्वागत वाय. एम. पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाची सुरूवात पाहुण्यांच्या हस्ते कलावती आईचे फोटो पुजन करून करण्यात आले.
यावेळी सत्कार मुर्ती नारायण पाटील, हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अंभियंत्या सौ. कल्पना तिरवीर व एम. डी. सदानंद पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मर्याप्पा पांखरे, शांताराम मेलगे, भरत गोरे आदीची भाषणे झाली.
तर सत्कार मुर्तीनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पिराजी पाखरे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी

Spread the love  खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *