खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे कोविड रूग्नाना सतत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी विश्वहिंदू परिषद बजरंग दलचे संयोजक अमोल परवी, अनिकेच गावडे व त्याच्या सहकार्यानी कोविड काळात २४ तास कोविड रूग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी रूणवाहिकामधून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, एखाद्या रूग्ण उपचार दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे आदी कार्य पाहून नगरसेवक प्रकाश बैलूरकडून १० पीपी किट्सचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विनायक कलाल, विलास मोरे, रामा बहादूर, निलेश सडेकर, प्रदिप दलाल, संतोष प्रदिप जाधव, प्रदिप देसाई, शुभम आंबेडवाडकर, रवि जाधव तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
