खानापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या माहामारीत जनतेला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे. असे असताना खानापूर स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून बॅंक व्यवहारासाठी पास बुकावर बारकोडची सक्ती केल्याने अनेक ग्राहकांच्या पास बुकावर बारकोड नाही. अशाना स्टेट बँकेला दोन महिन्यापासून हेलपाटे मारावे लागत आहे.
मात्र याची दखल स्टेट बँकेच्या व्यवस्थापकानी घेतली नाही. केवळ वाचमन बारकोडची अजुन व्यवस्था झाली नाही. असे सांगुन ग्राहकांना गेटच्या बाहेर पाठवुन देत आहे.
मात्र स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाना याचे काहीच देणेघेणे नाही. असे वागत आहेत.
खानापूरात स्टेट बँकेबाबत ग्राहकांच्या सतत तक्रारी येत आहेत. मात्र स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गातून सुधारणा काही अद्याप होत नाही.
तालुका प्रतिनिधी, तसेच राजकीय नेत्यांनी स्टेट बँकेच्या कारभाराबाबत लक्ष ग्राहकांना सहकार्य करावे अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Check Also
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा
Spread the love खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने …