खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सौजन्याने पौष्टिक आहार कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्षा गीता हलगेकर, उपाध्यक्ष मारूती गुरव, सर्व सदस्य, सीडीपीओ राममुर्ती, सुपरवायझर श्री. केरूर, श्रीमहालक्ष्मी सोसायटीचे गुंडू पाखरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक ज्योती कानशिडे यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी विविध मांडण्यात आलेल्या पौष्टीक आहाराची उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते परिक्षण करण्यात आले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन चोळीचा कार्यक्रम पार पडला. तसेच मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला तोपिनकट्टी विभागातीलअंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, शिक्षिका उपस्थित होत्या. आभार मुख्याध्यापिका श्रीमती परेरा यांनी मानले.
