खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी यांच्यात चर्चा होऊन काही दिवसाचा वेळ मागुन घेतला. मात्र शुक्रवारी दि. 24 रोजी कोणतीच सुचना न देता पीडब्ल्यूडी खात्याकडून जेसीबीने काढुन टाकण्यात आले. त्यामुळे गाळेधारकांचे पत्र्यासाठी व लोखंडा पैसा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याकडे कोण लक्ष देणार अशी चर्चा गाळधारकांतून होत आहे. यावेळी गाळेधारकांच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. हे सर्व साहित्य पीडब्ल्यूडी खात्याकडून घेऊन गाळेधारकांनी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. यापुढे आपल्याला गाळे केव्हा उभारण्यात येणार आहेत. अशी अपेक्षा गाळेधारकातून होत आहे. आता तालुक्यातील कोण नेते गाळेधारकांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …