बेळगाव (वार्ता) : आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. आपल्या न्याय हक्कासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळराव देसाई, गोपाळ पाटील, बळीराम पाटील, संभाजीराव देसाई, पांडुरंग सावंत, कृष्णराव बिर्जे, सूर्याजी पाटील, दत्तू कुट्रे, अशोक गोरे, निरंजन सरदेसाई, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, रणजीत पाटील, मारुती गुरव, विनायक सावंत, दामोदर नाकाडी, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, ज्ञानेश्वर सनदी, दिगंबर देसाई, सुधाकर देसाई, पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
