खानापूर : 61 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या नंदगड येथील तरुण मंडळाच्या कबड्डी क्रीडा महोत्सवास शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन दिवस हा महोत्सव चालणार
आहे.
स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच पी. के. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, माजी जि. पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, माजी ता. पंचायत सदस्य मल्लाप्पा मारिहाळ, मारुती चोपडे, माजी सभापती सयाजी पाटील, शिवसेनेचे नेते के. पी. पाटील, पुंडलीक पाटील, नारायण ऱ्हाटोळकर, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, सुहास पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रविवारी सांयकाळी अंतिम फेरीतील सामने खेळविले जाणार आहेत. त्यांनंतर बक्षीस वितरण व मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य नागेंद्र पाटील, राजू पाटील आदी परिश्रम घेत आहेत
Check Also
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!
Spread the love खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील …