खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला या 30 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली. याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे खानापूर-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला या मार्गावरून प्रवाशाना प्रवास करताना खड्ड्याशी सामना करावा लागतो आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे बुजविलेच नाही.
त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्ना आपघात होण्याचा संभव आहे.
जंगलभागातून जाताना एकीकडे हिस्त्रप्राण्याची भिती तर दुसरी महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य त्यामुळे या महामार्गाला कोणा वाली आहे की नाही. असेच म्हणावे लागेल.
हुबळी-गोवा बससेवा याच महामार्गावरून
हुबळी-गोवा बससेवा ही वर्षभर याच खानापूर जांबोटी, कणकुंबी, चोर्ला मार्गाने गोव्याला होत होती. त्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होतात.
चारचाकी वाहन धारकाना खड्ड्याचा ईशारा
खानापूर मार्गे जांबोटी, कणकुंबी, चोर्ला मार्गाने गोव्याला जाताना खड्ड्याचा ईशारा देण्यात येतो.
अतिवेगाने धावणार्या वाहनधारकाना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. अनेकजण या मार्गावर बळ पडले आहेत. मात्र संबंधित खात्याला तालुका प्रतिनिधींना याचे काहीच देणे घेणे लागत नाही. रस्त्यातील खड्ड्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. आतातरी लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय अशी मागणी खानापूर-जांबोटी कणकुंबी-चोर्ला मार्गाने जाणार्या प्रवाशातून होताना दिसत आहे.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …