खानापूर (प्रतिनिधी) : कशासाठी पोटासाठी म्हणत पाठीवर संसार घेऊन महाराष्ट्रातून खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर दाखल झालेल्या हात मजुर लोखंडापासून विळा, कोयता, कुदळ, कुर्हाड तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील रस्त्याच्या कडेला ठाण मा़ंडून आपला उद्योग करत आहेत.
रोज लोखंडापासून विविध धातू तयार करून ती खानापूर बाजारासह जवळपासच्या खेड्यात विक्री करून आपले जीवन जगत आहेत.
महिलाही लोखंडावर घाव घालण्यात तरबेज
पुरूष मंडळी लोखंडाला तापून त्यांना आकार देतात. मात्र तापलेल्या लोखंडावर घाव घालण्यात त्यांच्या महिला तरबेज आहेत. त्यामुळे लोखंडाला हवा तसा आकार देऊन विविध लोखंडी आवजारे बनवत आहेत.
सकाळी सर्वोदयापासून याच धंद्यात ही कुटूंब असतात. लोखंडाची आवजारे तयार झाली की, या महिलाच बाजारात त्याची विक्री करतात. तयार केलेल्या लोखंडाच्या विळ्याची किंमत 200 रूपये पासून 350 रूपये पर्यंत आहे. तर कोयता 250 पासून 400 रूपयापर्यंत, लहान कुदळ 150 रूपयापासून 300 रूपयापर्यंत आहे.
सध्या सर्वत्र सुगीचे दिवस चालू आहेत. त्यामुळे शेतकरी भात कापणी करण्यासाठी विळ्याची खरेदी करताना दिसत आहे. विळ्याची विक्री चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे.
ही कुटूंब पहाटे पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामात असतात. अंधार व्हायच्या आत रात्रीची जेवण करून काम बंद ठेवतात. रात्रीच्यावेळी सरकारी दिव्याच्या खालीच त्यांना राहवे लागते. पाऊस आला तर समस्या निर्माण होते. लहान मुलांना याचा त्रास होतो असे कुटूंब प्रमुख सांगतात.
गेल्या दोन महिन्यापासून जांबोटी क्रॉसवरील रस्त्यावर याचा संसार झोपडीत सुरू आहे.
अशातच ते सुखाचे दिवस काढताना दिसतात.
Check Also
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
Spread the love खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …