खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम वर्ष संपत आले तरी अद्याप पूर्ण झालेच नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे.
पारिश्वाड गावापासून खानापूर या महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अद्याप अर्धवटच आहे. काही ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट काम केलेला आहे. त्यामुळे खानापूरहून पारिश्वाडकडे जाताना या रस्त्याचा धोका संभवतो आहे.
पारिश्वाड भागातील जनतेची नेहमीच वर्दळ असते. तेव्हा रात्री अपरात्रीच्यावेळी या रस्त्यावरून ये-जा असते, खडी पसरल्याने वाहनांना तसेच दुचाकीस्वाराना ये-जा करणे धोक्याचे झाले आहे.
या धोकादायक रस्त्यावरून वाहनाचा अपघात होऊन जीव गेला तर याला जबाबदार कोण?
यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी तसेच संबधित खात्याच्या अभियंत्यानी, कंत्राटदारानी याकडे लक्ष देऊन त्वरीत पारिश्वाड गावापासून खानापूरपर्यंत अर्धवट असलेल्या पुलाचे काम पूर्ण करावे. अन्यथा पारिश्वाड भागातील जनता गप्प बसणार नाही. रास्तारोको करून संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाला जाब विचारणार आहे.
जत-जांबोटी महामार्ग हा गेल्या कित्येक वर्षापासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत होता. आजतागायत रस्ता दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे.