Monday , December 23 2024
Breaking News

खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा 13 वा वर्धापन दिन थाटात

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांचा १३वा अमृतमहोत्सव शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, श्री राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री. बाळू बाबू पाटील सेवानिवृत्त शिक्षक झुंजवाड, श्री. गंगाधर दौलतराव देसाई निवृत्त शिक्षक निडगल, सौ. वासंती बाबूराव पाटील निवृत्त मुख्याध्यापिका कुप्पटगिरी, गोविंद निंगाप्पा धबाले निवृत्त शिक्षक झुंजवाड, वामनराव लक्ष्मण पाटील निवृत्त मॉडेल मुख्याध्यापक कारलगा, श्री. गंगाराम मुकुंद चोपडे निवृत्त शिक्षक जळगे या सत्कारमुर्तींचा निवृत्तीपर सत्काराचे आयोजन श्री. बाबूराव नारायण पाटील निवृत्त मॉडेल मुख्याध्यापक गर्लगुंजी यांच्या सौजन्याने संपन्न झाला.

तत्पूर्वी २०२२-२०२३ सालामध्ये मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे काही सदस्य स्वर्गवासी झाले, त्यांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मराठी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरूजी होते. दीपप्रज्वलन माननीय आमदार श्री. विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलासराव बेळगांवकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. जयराम देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती फोटो पुजन श्री. अमृतराव महादेव शेलार चेअरमन खानापूर को-ऑपरेटीव्ह बँक आणि श्री. आबासाहेब नारायणराव दळवी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदक विजेते व सरचिटणीस म. ए. समिती खानापूर यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ. राधाकृष्णन फोटो पुजन श्री. पांडुरंग तुकाराम सावंत माजी तालुका पंचायत सदस्य व माजी मार्केटिंग सोसायटी नंदगड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी श्री. प्रकाश विठ्ठलराव चव्हाण म. ए. समिती नेते, श्री प्रसाद विठ्ठलराव पाटील ग्रामपंचायत सदस्य गर्लगुंजी, श्री. एम पी पाटील अध्यक्ष राजा शिवछत्रपती स्मारक ट्रस्ट खानापूर, श्री. रमेश मल्हारी धबाले उपाध्यक्ष नंदगड म. ए. समिती विभाग नंदगड, श्री. शंकर अप्पाण्णा गावडा प्राध्यापक लोकमान्य कॉलेज खानापूर, श्री. दे. भ. घाडी गुरूजी सेवानिवृत्त जिल्हा आदर्श शिक्षक, श्री. एम. व्ही. हुंदरे सेवानिवृत्त शिक्षक, श्री. अजित पाटील माजी सैनिक गर्लगुंजी, श्री. वसंतराव उमराव देसाई उपाध्यक्ष मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटना, श्री. वाय. बी. पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दोड्डहोसूर यांच्या उपस्थितीत वरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, माजी म. ए. समिती अध्यक्ष श्री. विलासराव बेळगांवकर, श्री. जयराम देसाई माजी जि पं सदस्य जांबोटी, श्री. आबासाहेब नारायणराव दळवी राष्ट्रपती आदर्श शिक्षक, श्री. पांडुरंग सावंत माजी ता. पं. सदस्य, श्री. प्रसाद विठ्ठलराव पाटील ग्रामपंचायत सदस्य गर्लगुंजी, श्री. शंकर अप्पाण्णा गावडा प्राध्यापक लोकमान्य कॉलेज खानापूर, श्री. अजित पाटील माजी सैनिक गर्लगुंजी, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री. दे. भ. घाडी गुरूजी यांनी सत्कार मुर्तीपर आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सचिव श्री. अनंत मष्णू पाटील यांनी केले. ईशस्तवन व स्वागतगीत श्री. संभाजी बाबाजी पाटील यांनी केले. यावेळी एन. के. पाटील सेवानिवृत्त शिक्षक किरहलशी यांनी व संघटनेच्या वतीने तसेच सत्कारमुर्तींच्या आप्तेष्टांकडून व मित्रमंडळींकडून शाल श्रीफळ व संघटनेचे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषण श्री. डी. एम. भोसले गुरूजी यांनी केले, उपस्थितांनी निवृत्त शिक्षक संघटनेच्या सभासदांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन सत्कारमुर्तींचा सहस्त्र चंद्र दर्शन समारंभ व शताब्दी समारंभ संघटनेच्या हस्ते व्हावा असे व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त जिल्हा आदर्श शिक्षक श्री. एन. एम. पाटील गुरूजी यांनी केले तर आभार संघटनेचे सचिव श्री. अनंत मष्णू पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

Spread the love  खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *