Tuesday , April 23 2024
Breaking News

बिडी-कित्तूर रस्त्यावर भीषण अपघात; 6 जण जागीच ठार

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी-कित्तुर रस्त्यावर कार झाडावर आढळल्याने कारमधील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मारुती स्विफ्ट कंपनीच्या डिझायर कार मधुन एकूण दहा जण प्रवास करत होते. बिडी जवळील गोल्याळी गावातील आपल्या नातेवाईकांकडे वालीमा कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे समजते, याबाबतची माहिती समजताच नंदगड पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमींना ताबडतोब उपचारासाठी बेळगावला पाठविले. तर गाडीतील मृत व्यक्तींचे, मृतदेह शव वीच्छेदनासाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत असलेल्या मंग्यानकोप गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये शाहरुख पेंढारी ड्रायव्हर ( वय 30) रायबाग, इकबाल जमादार (वय 50), सानिया लंगोटी (वय 37), उमरा बेगम लंगोटी (वय 17), शबनम लंगोटी (वय 37) फरान लंगोटी (वय 13) हे मृत पावले आहेत. तर या अपघातात एकूण चार जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये फरहा बेटगिरी (वय 18 ), सोफिया लंगोटी (वय 22), सानिया इकबाल जमादार (वय 36), माहीम लंगोटी ( वय 7) यांचा समावेश आहे. या अपघाताबाबत नंदगड पोलीस ठाणे व खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा : डॉ. अंजलीताई निंबाळकर

Spread the love  खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *