Wednesday , May 29 2024
Breaking News

जिल्ह्याच्या विकासासाठी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचे योगदान काय; डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा सवाल

Spread the love

 

खानापूर : सत्तेत असताना जिल्ह्यासाठी आवश्यक अश्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारणीसाठी हेगडे कागेरी यांनी अधिवेशनात एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही. वर्षानुवर्ष स्वतःकडे मंत्री पद असून देखील स्वतःच्या मतदारसंघाचा विकास ज्यांना करता आला नाही ते आता विकासाची भाषा बोलत आहेत. सहा वेळा आमदार, अनेक वर्षे मंत्रीपद, विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वपूर्ण पदे असून देखील जनतेची सेवा करण्यास निष्क्रिय ठरलेले विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले ते सांगावे असे कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या.
कुमठा येथील संतेगुळीत येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कर्नाटकात भाजपा सरकार होते. गोवा, केरळ येथे सीआरझेड प्रकल्पांना सवलती आहेत मात्र त्या सवलती कर्नाटकात नाहीत. भाजपा खासदार तथा आमदारांनी याबाबत कोणतीच कृती केलेली नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले की, तीस वर्षे खासदार असून देखील अनंतकुमार हेगडे यांचे अस्तित्व कधी मतदारांना जाणवलेच नाही. ते असून देखील नसल्यास जमा होते. सीआरझेड कोकण रेल्वे महामार्गाची समस्या, सागरी पर्यटन या बाबींकडे खासदार अनंत कुमार हेगडे तसेच भाजप सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे कारवार मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही याची मोठी किंमत येथील भूमिपुत्रांना मोजावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, काँग्रेसने पाच गॅरंटी योजना लागू करून कर्नाटकात सुशासन आणले आहे. कर्नाटक काँग्रेसने गृहलक्ष्मीच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले आहे. खऱ्या खोट्याची पारख करून जनता यावेळी आशीर्वाद रुपी मतदान आपल्याला देणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कारवार लोकसभा मतदारसंघाने तीस वर्षे भाजपाची निष्क्रियता अनुभवलेली आहे. एक वेळ काँग्रेसच्या विकासाची गॅरंटी अनुभवा असे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
माजी आमदार शारदा शेट्टी यांनी देखील डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. विधानसभा निवडणुकीत कर्नाटकातील जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखविला आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला केंद्रात बहुमत मिळवून द्या. गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी हाताला ताकद द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
केपीसीसीचे सरचिटणीस निवेदित अल्वा, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साई गावकर, उपाध्यक्ष आर. एच. नायक, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अब्दुल मजीत, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष भुवन भागवत आदी व्यासपीठावर होते.
यावेळी निजदचे नेते सुब्रमण्यम हेगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वालगळी, हळदिपूर येथील प्रचारसभांना देखील भरघोस पाठिंबा मिळत आहे.
प्रचारादरम्यान डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आदीचुंचनगीरी मठाची शाखा असलेल्या मिर्जनी मठाला भेट देऊन निश्चलानंदनाथ स्वामींचे आशीर्वाद घेतले. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना एक सुशिक्षित महिला उमेदवार तसेच मराठा चेहरा म्हणून कारवार लोकसभा मतदारसंघातून सर्वत्र भरघोस पाठिंबा मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकवाड येथील व्यक्तीने केला पत्नीचा खून! वास्को गोवा येथील घटना

Spread the love  खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *