खानापूर (वार्ता) : भारतातील 700 हून अधिक आदिवासी जमाती व गिरीजन विकास यांच्या उन्नतीसाठी तसेच सुरक्षेसाठी संविधानाच्या निर्मात्यानी राखीव व इतर सवलती दिल्या. या प्रकारे त्या लोकांना परिशिष्ट जमाती समावुन कायदा तयार केला.
मात्र अन्य धर्मात मतांतर झालेल्या, तसेच आपली संस्कृती, श्रध्दा, परंपरा सोडून मतांतर केलेल्याच्या सवलती सरकारकडून घेतल्या जात आहेत. यासाठी आदिवासी जमातीच्या लोकाना सुरक्षा देण्यासाठी जिल्हास्तरीय आदिवासी जमाती सुकक्षा संमेलन आयेजित करण्यात आल्याचे प्रमुख वक्ते डॉ. नानु पाटील यांनी खानापूर येथील होसमनी हॉलमध्ये बोलताना व्यक्त केले.
श्रीश्रीश्री चन्नबसव देवरू स्वामी आवरोळी मठाचे स्वामी यांच्या सान्निध्यात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर जोरापुरे होते. उद्घाटक म्हणून प्रवचनकार मारूती पाटील, प्रमुख पाहुणे एसीएफ शिवरूद्रापा कबाडी नागरगाळी, तुळसीदास पटकारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू, डॉ. बाबू पाटील, मारूती महाराज, अमर जोरापुरे, आदींच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी चन्नबसव देवरू स्वामी, एसीएफ शिवरूद्रापा कबाडी आदींनी विचार मांडले.
कार्यक्रमाला कार्यदर्शी बाबू पाटील, खानापूर तालुका प्रमुख बाबू शिंदे, सुभाष देशपांडे, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, गुंडू तोपिनकट्टी, धनश्री सरदेसाई, राजश्री देसाई, वासंती बडगेर, आदीवासी जमातीचे नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक वसंत देसाई यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत बाबू शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधुन आदिवासी जमातीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जंगल हक्क कायदा 2006 हा परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करणे, बीरसा मुंडा जयंती सरकार दरबारी साजरी व्हावी. आश्रम शाळाना बीरसा मुंडा नामकरण व्हावे, आदी मागणीचे निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत देसाई यांनी केले. शेवटी आभार किरण यळ्ळूरकर यांनी मानले.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …