खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून तिसर्या लाटेचे संकट निर्माण होत आहे.
याची खबरदारी घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा तसेच हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गापर्यतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्यास मंगळवारी दि. 11 ते मंगळवारी दि. 18 पर्यंत निर्बंध घातले आहे. त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांविना शुकशुकाट पसरला आहे. मंगळवारी सर्व शाळाचे पटांगण तसेच इमारतीत विद्यार्थी वर्गाचा किलबिलाट बंद होता. सर्वत्र शांतता दिसून आली. कित्तूर येथील निवासी सैनिक स्कूलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. आणि 80 विद्यार्थीनीना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच येथील 10 कर्मचार्यांनाही कोरोनाची बांधा झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी तातडीने बैठक घेऊन दि. 11 ते 18 पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नुकताच शाळांना सुरूवात झाली. अभ्यासक्रमही सुरू होता. विद्यार्थी अभ्यासाकडे वळले होते. मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच झळ पोहचताच जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद झाल्या. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ऑनलाईनचा आदेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा आठ दिवस शाळा विद्यार्थ्यांविना राहणार आहेत.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …