Tuesday , June 18 2024
Breaking News

खानापूर अंगणवाडी सेविकांची निवड यादी तब्बल 6 महिन्यानंतर जाहिर

Spread the love

खानापूर (वार्ता) : गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 15 अंगणवाडीत नेमणुकीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील महिलावर्गातुन समाधान पसरले होते. अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले. गेल्या सहा महिन्यापासून नोकरीची अपेक्षा करणार्‍या अंगणवाडी शिक्षिकाची यादी तब्बल सहा महिण्यानंतर जाहिर झाली आहे. तेव्हा कुणाला आक्षेप नोंदवायचा असल्यास 27 जानेवारीच्या आत नोंदवावा असे आवाहन सीडीपीओनी केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिकाच्या जागा गेल्या कित्येक वर्षानंतर भरण्यात येत आहेत. यासाठी सरकराने दहावीच्या परीक्षेत प्रथम भाषा कन्नड 125 मार्काचा विषय पास पाहिजे असा आदेश दिल्याने खानापूर तालुक्यातील 80 टक्के मराठी भाषिक महिलावर्गातुन मोठी नाराजी पसरली होती
कारण मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा मराठी भाषा आहे, तर तृतीय भाषा कन्नड आहे. असे असताना मराठी माध्यमच्या महिलांना अंगणवाडीमध्ये शिक्षिका म्हणून नियुक्ती मिळणार नाही. ही बाब तालुका लोकप्रतिनिधीच्या लक्षात आली पाहिजे. यासाठी त्याचे महत्वाचे प्रयत्न राहणे गरजेचे आहे.
आज अंगणवाडी शिक्षिकाच्या नेमणूका करण्यास विलंब झाला. सहा महिने ओलांडले एकीकडे अंगणवाडीत शिक्षिका नसल्याने अंगणवाडी बालकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दुसरीकडे प्रथम भाषा मराठी असलेल्या महिलांवर अन्याय झाला आहे. तर प्रथम भाषा कन्नड असलेल्या शिक्षिकांना मराठी माध्यमच्या अंगणवाडीच्या बालकाना मराठी भाषा कसे शिकविणार. परत मराठी प्रथम भाषा असलेल्या महिलाना अंगणवाडी शिक्षिकाच्या नेमणूका कशा होणार. तेव्हा मराठी सीमाभागातील जनतेवरील भाषेचा अन्याय थांबला पाहिजे. मराठी भाषिक महिलाना अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूका झाल्या पाहिजेत, अशी मागणी केली जात आहे.
असे असताना अंगणवाडी शिक्षिका म्हणून घोटगाळी, हडलगा, मुडेवाडी, कारलगा या चार मराठी भाषिक गावात नेमणूका झाल्या आहेत.
तर मदतनीस आया म्हणून गर्लगुंजी, कडोलकर गल्ली खानापूर, संगरगाळी, डोंगरगाव, लोंढा, मुडवाड, गोधोळी, लिंगनमठ, डोंबरवाडा खानापूर, वड्डेबैल, शिरोली आदी गावाना नेमणूका करण्यात येणार आहेत.
नेमणूकीसाठी लाखोची मागणी
खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या नेमणुकीच्या वेळी लाखोची मागणी होत असल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे. तेव्हा यावर जनतेने वचक ठेवावा. व सत्य बाहेर काढावे, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

Spread the love  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *