Tuesday , March 3 2026
Breaking News

गोवा येथील अपघातात खानापूरच्या तरुणाचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. मृतांपैकी एक खानापूर तालुक्यातील तरुण आहे.

गुरुवारी दुपारी फोंडा येथील बेतोडा परिसरात एक भीषण अपघात घडला. या घटनेत खानापूर तालुक्यातील लोंढा पिंपळे येथील आदित्य देसाई (२२) हा तरुण जागीच ठार झाला. त्याचा साथीदार योगेश पाटील गंभीर जखमी झाला.

हे तरुण दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. दुसरी दुचाकी चालवणारी इशा गावस्केरी हिचाही मृत्यू झाला आणि तिच्यासोबत असलेली आदिती मांजरेकर ही गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारासाठी फोंडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *