खानापूर (वार्ता) : चापगांव (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवारी दि. 2 रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 9 वा आणि 12 ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पीडीओ शिवलिंग मारीहाळ होते.
दीपप्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष मारूती चोपडे, सदस्य नागराज यळ्ळूरकर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले, आदीच्याहस्ते करण्यात आले.
तर विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन ग्राम पंचायत सदस्य नजीर सनदी, पीकेपीएस सदस्य पिराजी कुराडे, नारायण गोदी, बाबू घार्शी, देमव्वा मादार, डॉ. निंगापा यळगुकर, रमेश घार्शी, कल्लापा पाटील, भाऊराव पाटील, तुकाराम धबाले आदीच्याहस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी श्री महालक्ष्मी गोशाळेचे संस्थापक भरमाणी पाटील यांनी पारायण सोहळ्याबद्दल विचार व्यक्त केले.
दोन दिवस चालणार्या पारायण सोहळ्यास सायंकाळी प्रवचन, किर्तन, रात्री जागर होऊन, गुरूवारी दि. 3 रोजी पहाटे काकड आरती,गावात दिंडी सोहळा होऊन महाप्रसादाने श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सागंता होणार आहे.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …