खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा समिती धडक मोर्चाद्वारे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता निवेदन देऊन कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत. तरी खानापूर युवा समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच खानापू तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच तालुक्यातील ऊस उत्पादकांनी वेळेवर हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील यांनी केले आहे.
