खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात बागायत खात्याच्यावतीने शेतकरीवर्गासाठी मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य शिवापा चलवादी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण तालुका अधिकारी रामकृष्ण मुर्ती होते. त्याचबरोबर बागायत खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बागायत खात्याच्यावतीने ड्रीप इरिगेशन बदल मार्गदर्शन, मुसरूम उत्पादन, पाम ऑईल उत्पादन, तसेच विक्री भाजीपाला उत्पादन आणि आंबा फळाचे उत्पादन आदी विषयांवर, मार्गदर्शन शिबीर पार पडले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व फोटो पुजन उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. खानापूर तालुका हा अतिमागासलेला तालुका असुन केवळ भात व ऊस पिकाचे तेव्हढेच उत्पादन घेतले जात होते. मात्र अलिकडे खानापूर तालुक्यातील शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करून बागायत खात्याच्यावतीने विविध उत्पादन घेत आहेत. तेव्हा शेतकरी वर्गाने बागायत शेती करून प्रगती साधावी, असे आवाहन माजी तालुका पंचायत सदस्य शिवापा चलवादी यानी केले.
यावेळी बागायत खात्याच्यावतीने अधिकारीवर्गाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन शिबीराला खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …