खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्या पाठपुराव्यास यश
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सोळा वर्षानंतर सागरे येथे लक्ष्मी देवीची यात्रा होणार असून यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. मात्र गावाला बस सेवा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता यात्रा काळात बस सेवा पुरवावी अशी मागणी युवा समितीच्या पदाधिकार्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकार्यांची भेट घेऊन रविवारी केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा डेपो व्यवस्थापक यांची भेट घेऊन बस सुरू करण्याची मागणी केली त्यानंतर बस सेवा सुरू करण्यात आली असून बस सेवा सुरू करण्यात आल्या बाबत सागरे ग्रामस्थांच्यावतीने डेपो व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी फक्त यात्रा काळात बस सेवा सुरू न ठेवता दररोज बस सोडावी अशी मागणी केली. यावेळी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर बस सेवा कायम ठेवली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
खानापूर, नंदगड, कसबा नंदगड, सागरे ते बीडी असा बसचा मार्ग असणार आहे. तसेच यात्रा काळात बसच्या तीन फेर्या असणार आहेत. डेपो व्यवस्थापकांशी चर्चा करतेवेळी सचिव सदानंद पाटील, मिलिंद देसाई, राजू पाटील, मारुती गुरव, एस. बी. हळब, संजीव जुंझवाडकर, ईराप्पा पाटील, गणेश फटाण, तुकाराम पाटील, एकनाथ पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …