खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लब आणि श्री जनरल हाॅस्पिटल खानापूर यांच्या सौजन्याने तालुक्यातील ८० दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी नुकताच संपन्न झाली.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी डाॅ. कविता मुजूमदार, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, डाॅ. अजित हुंडेकर, डाॅ. अभिषेक मुगरवाडी, डाॅ. प्रताप, तसेच नितीन मुजूमदार आदीचे पुष्पहार घालुन स्वागत केले.
यावेळी खानापूर तालुक्यातील १५ वर्षाखालील जवळपास ८० दिव्यांग मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
दिव्यांग मुलाच्या आरोग्य तपासणी शिबारावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी, माजी अध्यक्ष अजित पाटील, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, सागर उप्पीन, प्रकाश गावडे, ज्यूनेद तोपिनकट्टी, तसेच खानापूर लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
