खानापूर (प्रतिनिधी): तब्बल दोन वर्षानंतर आरोग्य खात्याच्यावतीने खानापूर सरकारी दवाखान्यात ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ रविवार दि. २७ रोजी देण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे, डॉ. तसमीन भानू, डॉ. प्रगती विनायक, डॉ. प्रेमा तोंडी, त्याचबरोबर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, डाॅ. रवीराज पै, डाॅ. शिवानंद किनगी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थित बालकाला पोलिओ डोस पाजुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत शिवानंद बुडलकट्टी यांनी गुलाब पुष्प देऊन केले. यावेळी तालुक्यातील ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यातील पीएचसी सेंटरमध्ये पुढील प्रमाणे बालकाना पोलिओ डोस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
अशोक नगर पीएचसी सेंटरमध्ये १४१६ बालके, बिडी पीएचसी सेंटरमध्ये २१८१ बालके, गणेबैल पीएचसी सेंटरमध्ये २४३८ बालके, हलशी पीएचसी सेंटरमध्ये १२७५ बालके, इटगी पीएचसी सेंटरमध्ये २५१५ बालके, कक्केरी पीएचसी सेंटरमध्ये २४६७ बालके, कणकुंबी २११५ बालके, लोंढा पीएचसी सेंटरमध्ये १३५५ बालके, नंदगड पीएचसी सेंटरमध्ये १५१२ बालके, पारिश्वाड पीएचसी सेंटरमध्ये ३२८७ बालके तर खानापूर शहरात १४९९ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.
पोलिओ डोस कार्यक्रमाला ६१६ टीम कर्मचारी, ३२ सुपरवायझर, १५४ बूथ कर्मचारी आदीची नेमणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीपासून घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार आहे. तर बसस्थान, रेल्वेस्थानकांवर तसेच ग्रामीण भागातील वीटभट्टी मजूरांच्या झोपडीपर्यंत पोलिओ डोस देण्याची सोय करण्यात आली आहे.
तेव्हा तालुक्यातील ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना न चुकता पोलिओ डोस घेण्यात यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे यांनी केले आहे.
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …