खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातील शिवालये मंदिरे मंगळवारी दि. १ मार्च रोजी होण्याऱ्या महाशिवरात्रीच्या सणानिमित्त मंदिरातून रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे.
खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात असलेल्या महादेवाच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या सणाचे औचित्य साधुन मंदिराची रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई, मंडप घालण्यात आले आहे.
येथे शंभोमहादेवाच्या भक्तांची नेहमीच गर्दी असते. संपूर्ण खानापूर शहरवासीय महाशिवारात्रीच्या सणानिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.
मंगळवारी दि. १ मार्च रोजी पहाटे महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. फुलानी पिंडी सजवली जाते. विधीवत पुजा केली जाते. सकाळी भजन केला जातो.
मंगळवारी दिवसभर भाविक मंदिरात येऊन शंभोमहादेवाचे दर्शन घेतात. यावेळी भाविकांसाठी तिर्थप्रसादाचे आयोजन केले जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत भाविक येतच असतात.
खानापूरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात असलेले महादेव मंदिर फार वर्षापूर्वीचे आहे. त्यामुळे दर सोमवारी खानापूरातील भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावतात.
उद्या मंगळवारी महाशिवारात्रीच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी असते.
तालुक्यातील असोगा येथेही खास महाशिवारात्रीच्या सणानिमित्त रामलिंगेश्वर मंदिरात तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.
जवळ असलेल्या मलप्रभा नदी स्नानाचा आनंद घेतात. त्यामुळे असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिरात दर्शनासाठी खानापूर तालुक्यासह बेळगांव तालुक्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220228-WA0138-660x330.jpg)