खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. तरी कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सरचिटणीस आबासाहेब दळवी येत कळविले आहे.
