Saturday , July 27 2024
Breaking News

खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलन

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीत स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करताना सेवा ज्येष्ठठेचा विचार करण्यात यावा. तसेच स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम करण्यात यावे. इतर विभागात काम करणाऱ्याचा विचार करूनये, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी वर्गाने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, चीफऑफिसर बाबासाहेब माने आदीना देण्यात आले. यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार, नारायण मयेकर, रफिक वारेमनी, नगरसेविका मेघा कुंदरगी उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर नगरपंचायतीत ३३ स्वच्छता कर्मचारी म्हणून गेल्या २० वर्षा पासून कंत्राट पद्धतीने काम करतात. मात्र २१ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर यामध्ये माजी सैनिक तसेच इतर मागासवर्गीय जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने यामध्ये जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सेवाज्येष्ठता डावलून काहीजण नोकरीत कायम होण्यासाठी धडपडत करत आहेत. असा प्रकार झाल्यास गेली वीस वर्षे शहर स्वच्छता करण्यात येणाऱ्या जेष्ठ स्वच्छता कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी नोकरीपासुन वंचित राहावे लागणार. यासाठी कायम स्वरूपी नेमणूक प्रक्रिया ही पारदर्शक पणे व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी निवेदनाचा स्विकार नगराध्यक्ष मजहर खानापूरी व चीफऑफिसर बाबासाहेब माने यांनी केला.
निवेदन देताना कर्मचारी शानूर गुडलार, रामा सोनटक्के, किरण केसरेकर, यल्लापा हंचनाळ, संतोष जाधव, विनोद कुदळे, किशोर कुदळे, अनुराज मेत्रै, पुन्ना सोनटक्के आदी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *