देवलत्ती (ता. खानापूर) गावच्या श्री लक्ष्मीदेवी यात्रेत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देवलत्ती ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
देवलत्ती (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील श्री लक्ष्मी देवी यात्रोत्सव सुमारे 26 वर्षानंतर यंदा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सदर निर्णयानुसार येत्या 12 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये देवलत्ती येथे श्री लक्ष्मीदेवी यात्रा आयोजित केली जाणार आहे.
तरी सदर यात्रोत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा व आरोग्य कर्मचारी नेमण्यात यावेत. त्याचप्रमाणे 24 तास वीज आणि पाणीपुरवठ्याची सोय केली जावी. यात्रेदरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासमवेत यात्रा कमिटीचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुखांना देखील सादर करण्यात आली.
Check Also
नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा; माजी आमदार दिगंबर पाटील यांचे आवाहन
Spread the love खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन खानापूर : मराठी अस्मितेसाठी …