खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील १५ दहावीच्या परीक्षा केंद्रात ३७८६ विद्यार्थी असुन एका वर्गात जास्तीत जास्त २० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्याची सुचना परीक्षा मंडळाने पत्रक काढुन दिली आहे.
यंदा कोरोनाचे नियम पाळुनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
सोमवारी दि. २८ मार्च पासुन ते दि. ११ एप्रिल पर्यंत होणार आहे. परीक्षा केंद्रात जंतुनाशक फवारणी, सुरक्षित अंतर राखण्यासाठी आरेखन, सॅनिटायझर, मास्कचा वापर आदीची सक्ती करण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यातील दहावी परीक्षेसाठी ३७८६ विद्यार्थी असुन मुलांची संख्या १९१० तर मुलींची १८७६ संख्या आहे. ग्रामीणमध्ये १२ सेंटर, तर शहरात ३ सेंटर अशी एकूण १५ सेंटर आहेत. परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन स्काॅड ठेवण्यात आले यात तहसीलदार ग्रुप, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी ग्रुप, व बीईओ ग्रुप असे तीन स्काॅड असुन एकूण ३०० सुपरवायझरची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक सेंटर वर सी सी कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना खानापूर तालुक्याचे बीईओ लक्ष्मणराव यकुंडी यांनी दहावी परीक्षेबद्दलची माहिती दिली.
