खानापूर (प्रतिनिधी) : हरसनवाडी (ता.खानापूर) येथील लोअर प्रायमरी प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे. ए. मुरगोड यांचा चिकोडी येथे शिक्षण सेवा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
रविवार दि. २६ रोजी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्य मर्यादित अंतरराज्य पुरस्काराचे वितरण रंगदिनाचे औचित्य साधुन चिकोडी येथे करण्यात आला.
यावेळी पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री रत्नामाला सावनुर, माजी खासदार बॅ. अमरसिंह पाटील, माजी जिल्हा कमांडट अरविंद घट्टी, कोल्हापूरचे माजी महापौर राजू सिंगाडे, आदिंच्याहस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पहार व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील हरसनवाडी लोअर प्रायमरी मराठी शाळेत त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून २४ वर्षे सेवा बजावत आहे. त्यांच्या या शैक्षणिक सेवेची दखल घेऊन शिक्षण सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्याच्या सत्कारामुळे खानापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.